Uncategorized
Trending

परवानगी नाकारली तरी वाजत-गाजत निघाली वरात; नवरदेवासह साऊंड मालकावर गुन्हे दाखल

बेलगाम प्राईड / बेळगावमधील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या अनगोळ भागात लग्नामध्ये विनापरवानगी साऊंड सिस्टिम वापरल्याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. ध्वनी प्रदूषण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याबद्दल नवरदेव आणि साऊंड सिस्टिम मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

६ मे २०२६ रोजी रात्री ११ च्या सुमारास अनगोळ येथे ही घटना घडली. येथील एका युवकाने याने आपल्या लग्नानिमित्त घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम लावली होती. यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.

या प्रकरणी डॉल्बी मालक आणि एका वर गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, या लग्नासाठी साऊंड सिस्टिम वापरण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. मात्र, हा परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने तेथील वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना त्रास होऊ नये, या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

परवानगी नाकारलेली असतानाही साऊंड सिस्टिमचा वापर करून ध्वनी प्रदूषण केल्यामुळे या दोघांवर टिळकवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि कर्नाटक पोलीस कायदा १९६३ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

कोणताही सार्वजनिक किंवा खाजगी कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी संबंधित विभागाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच ध्वनी प्रदूषणाचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!