
बेलगाम प्राईड/ मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे क्रीडा सप्ताहानिमित्त इनडोअर गेम्समधील बुद्धिबळ, बॅडमिंटन व कॅरम स्पर्धांचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. दि. १२ जून रोजी या स्पर्धांचे उद्घाटन संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. नागेश, स्पोर्ट्स क्लबचे इंचार्ज डॉ. महेश भानुशाली, डॉ. अनिल के., डॉ. देविका कोटेकर, डॉ. राधिका पाटील, बुद्धिबळ स्पर्धेचे समन्वयक प्रा. श्रीजित पाटील, कॅरम स्पर्धेचे समन्वयक डॉ. श्रीधर देशपांडे, बॅडमिंटन स्पर्धेचे समन्वयक डॉ. प्रसन्ना सुतार, ग्रंथपाल संजय गावडे तसेच प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. क्रीडा सप्ताहादरम्यान विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. महाविद्यालयात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.




