
बेलगाम प्राईड/ माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेऊन ते संबंधित मालकांना परत देण्यात माळमारुती पोलिसांना मोठे यश आले आहे. CEIR पोर्टलच्या मदतीने विविध कंपन्यांचे एकूण ४६ मोबाईल फोन शोधून काढण्यात आले असून, रविवारी (दि. २६ जुलै) हे मोबाईल त्यांच्या मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
माळ मारुती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नागरिकांचे मोबाईल हरवले होते. यासंदर्भात मोबाईल मालकाने आपले मोबाईल हरवले असल्याच्या तक्रारी माळ मारुती पोलीस स्थानकात नोंदविल्या होत्या.
हरवलेले मोबाईल आपल्याला परत मिळावेत म्हणून नागरिकांनी यासंदर्भात तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी CEIR पोर्टलचा वापर करून तांत्रिक तपास केला. त्यातून विविध ठिकाणी वापरात असलेले मोबाईल शोधून काढण्यात आले. आणि त्यांची खातरजमा करून संबंधित मालकांना परत करण्यात आले.

या मोहिमेत पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पोलीस उपनिरीक्षक आनंद आदगोंड, श्रीशैल हुळगेरी, उदय पाटील, पी. एम. मोहिते, तसेच कर्मचारी संदीप नडुगेरी, महेश मळगली, डी. वाय. मुरगोड, बसवराज कुळोळी आणि तांत्रिक कर्मचारी रमेश अक्की व महादेव कासीद यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
या उत्कृष्ट कार्याबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.




