
बेलगाम प्राईड / नेहमीप्रमाणे दुचाकीवरून जातेवेळी समोरील बाजूस खोदून ठेवण्यात आलेल्या रस्त्यामुळे नाल्यात पडून मोटरसायकल वरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री जुना पीवी रोड गांधीनगर नदी बायपास रस्ता येथे घडली.
या अपघातात सुरेश हनुमंत योगी (वय 27) रा. हेब्बाळ ता. मुधोळ महंणतेस शरणाप्पा दुडूम (वय 27) रा. असे अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जुना पीबी रोड या ठिकाणी ब्रिज लागत असून या पुढील बाजूस ब्रिजचे काम पूर्णत्वात न झाल्याने तो ब्रिज खुल्ला असल्याने याचा अंदाज कोणालाही येत नाही या ठिकाणी विद्युत पुरवठा आहे अपुर असल्याने वाहन चालकांना धोकादायक बनला आहे.
यासंदर्भात प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्याकडे वेळोवेळी या भागातील शेतकऱ्यांनी तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष केल्याने आजही अपघात घडल्याची वेळ आली आहे. या ठिकाणी आणखीन कोणाचा अपघात होऊन मृत्यु मुखी पडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का अशा प्रतिक्रिया या भागातील शेतकरी वर्गाने केली आहे.




