Uncategorized
Trending

युनियन जिमखाना क्लब मध्ये गोळीबार करण्याचा प्रयत्न 

BelgaumPride -July 14, 2026

बेलगाम प्राईड/ बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयाच्या शेजारी असलेल्या युनियन जिमखाना क्लबमध्ये मंगळवारी रात्री 8-30 च्या सुमारास थरारक पूर्व वैमनस्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न घडल्याची घटना घडली.

या घटनेत सुरेश जालगार या व्यक्तीवर गोळीबार करून हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. मात्र बंदुकीमध्ये गोळी घालते वेळी त्याची गोळी फायरिंग करण्यापूर्वी खाली पडली त्यामुळे तो अनर्थ टाळला गेला घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार सुरेश जालगार हा रमी क्लबमध्ये खेळत असताना पाच जणांचा एक गट तेथे आला. त्यापैकी दोन जण क्लबबाहेर थांबले, तर तीन जण आत प्रवेश करून सुरेश यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बाहेरील बाजूस प्रफुल पाटील ही व्यक्ती देखील गाडीत बसून होती असे पोलिसांच्या चौकशीत निदर्शनास आले आहे.

यावेळी एका आरोपीने सुरेश यांच्या डोक्यावर बंदूक रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी त्या बंदुकीतील गोळी खाली पडली गेली त्यामुळे सुरेश यातून बचावला गेला मात्र सुरेश यांनी आरोपीला जोरात ढकलून तेथून पळ काढल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. त्यानंतर आरोपी क्लबबाहेर येत हवेत आणखी दोन गोळ्या झाडून घटनास्थळावरून पसार झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची तपासणी करून पुरावे संकलित करण्यात आले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर सुरेश त्या ठिकाणी आला त्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

पोलिसांनी सुरेश जालगार यांची चौकशी केली असून त्यांनी यापूर्वी बेनकन हल्ली येथे प्रफुल पाटील या युवकावर गोळीबार करण्यात आलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सूडबुद्धीने हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र या दाव्याची पोलीस अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती नजरेसमोर आली आहे.

युनियन जिमखाना या क्लब मध्ये जो घडलेला प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे याचे सर्व फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध लावला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!