Uncategorized
Trending

सीमाप्रश्नी समिती कार्यकर्त्याच्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल

बेलगाम प्राईड / गेल्या सहा दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात खादरवाडी येथील एका म. ए. समिती कार्यकर्त्याने केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तर दिले आहे.

खादरवाडी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते प्रकाश नेसरकर यांनी या पत्रात असा उल्लेख केला होता की गेली अनेक दशके प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाशी एक पत्रव्यवहार केला होता. त्या पत्राची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून संबंधित प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे.

एका सामान्य समिती कार्यकर्त्याच्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली दखल पाहता बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे राबविण्यात येत असलेल्या एक लाख स्वाक्षऱ्यांच्या मोहिमेला प्रतिकूल ठरू शकते असा विश्वास मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केला आहे .

सीमावाद खटल्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या स्वाक्षऱ्यांच्या मोहिमेत सर्व मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाखोच्या संख्येने स्वाक्षरा असलेले निवेदन लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!