Uncategorized
Trending

आर्थिक व्यवहारातून मजगावच्या युवकाचा हुंचनहट्टी येथे खून

बेलगाम प्राईड/ बेळगावजवळील जयनगर-हुंचेनहट्टी परिसरात बुधवारी सायंकाळी एका तरुणाची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल तिप्पाण्णा तळवार (वय 23) रा. तानाजी गल्ली, मजगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हा बेळगावातील एका औषध दुकानात काम करत होता. बुधवारी सायंकाळी सुमारे 5.15 वाजण्याच्या दरम्यान रामेश्वरनगर परिसरात त्याला बोलावण्यात आले होते. तेथे आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादातून काही जणांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या राहुलचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी तसेच बेळगाव ग्रामीण विभागाचे एसीपी गंगाधर बी. एम. यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते.

या प्रकरणात आठ ते दहा जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मृत राहुलच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार असून या घटनेमुळे मजगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!