
बेलगाम प्राईड/ अंकले -संकेश्वर येथील गौरव भरमाजी पाटील याची इंडिगो कंपनीत वैमानिक म्हणून निवड झाली, त्याचे प्राथमिक शिक्षण एस. एस.पाटील (खातेदार), शंकरलिंग स्कूल, चिकालगूड व महाविद्यालयीन शिक्षण मूडबिद्री तसेच कारकल येथे तर वैमानिक शिक्षण चेन्नई याठिकाणी झाले. दूंडगे (ता. गडहिंग्लज) विद्यामंदिर शाळेचे शिक्षक भरमाजी पाटील व संकेश्वर मराठी मुलींच्या शाळेच्या शिक्षिका सौ. भारती पाटील यांचा गौरव हा मुलगा आहे. कष्टातून मिळविलेल्या यशाबद्दल गौरव याचे कौतुक होत आहे.




