लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार वितरण समारंभ
मध्यवर्ती म.ए. समितीचे आवाहन

बेलगाम प्राईड/ राजारामबापू पाटील ललित कला अकादमी महाराष्ट्र राज्य आणि शब्दगंध कवी मंडळ संघ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सायंकाळी ५-०० वाजता श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल जवळ ओवर ब्रिज खानापूर रोड बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास बेळगाव बेळगाव तालुका खानापूर तालुक्यातील मराठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश मरगाळे कार्याध्यक्ष श्री मनोहर किनेकर सरचिटणीस श्री मालोजी अष्टेकर यांनी केले आहे.
या कार्यक्रमात डॉक्टर सुनील कुमार लवटे माननीय सिसिलिया कारवालो डॉक्टर विवेकानंद गोपाल डॉक्टर सुरेंद्र दरेकर डॉक्टर रणधीर शिंदे आणि श्री अनंत कदम इत्यादींचा सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मंत्री श्री जयंतराव पाटील तर अतिथी म्हणून डॉक्टर माणिकराव साळुंखे डॉक्टर अशोक चौसाळकर व श्री प्रतीक पाटील हे उपस्थित राहणार आहेत.




