Uncategorized
Trending

पत्रकार परिषदेत पालकमंत्री जार्किहोळीची विविध विषयावर चर्चा 

बेलगाम प्राईड/ सतीश जार्किहोळी यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले. की, बहुकोटी कोट्यावधी रुपये फसवणूक करणाऱ्या शिवम असोसिएट या संस्थेचे मालक शिवानंद नीलण्णवर यांच्या प्रकरणाची चौकशी अधिकृतपणे सीआयडी कडे सोपवण्यात आली आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “या प्रकरणाची चौकशीसाठी सीआयडी कडे देण्यात आली आहे. ते अधिकारी तपास पूर्ण करून अहवाल दिल्यानंतरच या घोटाळ्याचे संपूर्ण सत्य आणि अचूक माहिती समोर येईल असे सांगण्यात आले.

शिवम असोसिएट्सच्या कोट्यावधी रुपयाच्या फसवणूक प्रकरणाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून, हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक फसवणुकीशी संबंधित प्रकरण आहे. बेकायदेशीरपणे पैसे गोळा करून लोकांची फसवणूक केल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा प्रेरणा नाही, असे मंत्र्यांनी सांगितले.

गुंतवणुकीत लोकांनी सावध राहावे

जास्त व्याजाच्या आमिषाला बळी पडून नागरिकांनी कष्टाने कमावलेले पैसे अनधिकृत संस्थांमध्ये गुंतवू नयेत. गुंतवणूक करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले.

“कोणतीही संस्था नियमबाह्य पद्धतीने जास्त नफा देण्याचे आमिष दाखवत असेल तर लोकांनी सतर्क राहावे. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाईबरोबरच जनजागृतीही महत्त्वाची आहे,” असे ते म्हणाले.

अलीकडेच राज्य सरकारने IPS अधिकारी संदीप पाटील यांची बदली करून त्यांची बेळगाव उत्तर विभागाचे नवे पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून, ते लवकरच पदभार स्वीकारतील, असेही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. निवडणुका संपताच गॅस, पेट्रोल, डिझेल आणि आवश्यक वस्तूंच्या किंमती वाढवणे ही केंद्र सरकारची जुनी सवय असल्याचे त्यांनी म्हटले.

इंधन आणि आवश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे जीवन कठीण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. निवडणुकांच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी दर स्थिर ठेवले जातात आणि निवडणुका संपताच अचानक दरवाढ केली जाते, असा आरोपही त्यांनी केला.

तसेच, केंद्र सरकारच्या सततच्या दरवाढीचे समर्थन जागतिक संकट आणि विकासाच्या नावाखाली करणे चुकीचे आणि जनविरोधी असल्याचे त्यांनी म्हटले. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल दर १ रुपयाने वाढला तरी आंदोलन करणारे भाजप नेते आज स्वतः सतत दरवाढ करूनही शांत आहेत, यामागे राजकीय स्वार्थ दडलेला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

“सत्तेत आल्यानंतर भाजप नेते सामान्य जनतेच्या आर्थिक अडचणींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. दरवाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जीवन कठीण झाले असतानाही त्याचे समर्थन करणे हे त्यांच्या जनविरोधी भूमिकेचे द्योतक आहे,” असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!