Uncategorized
Trending

उत्तर विभागाच्या आयजीपीपदी संदीप पाटील यांनी स्वीकारली सूत्रे

बेलगाम प्राईड/ वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप पाटील यांनी आज उत्तर विभागाचे नवे आयजीपी म्हणून अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. आतापर्यंत या पदाची धुरा सांभाळणारे आयजीपी चेतनसिंग राठोड यांनी नवनियुक्त आयजीपी संदीप पाटील यांच्याकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली.

बेळगाव हे मुख्य केंद्र असलेल्या उत्तर विभागाच्या पोलीस दलातील हा सर्वोच्च प्रशासकीय बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आतापर्यंत उत्तर विभागाचे आयजीपी म्हणून कार्यरत असलेले चेतनसिंग राठोड यांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट सेवा बजावली आहे. आज त्यांनी नवनियुक्त अधिकारी संदीप पाटील यांचे स्वागत करत त्यांच्याकडे अधिकृतपणे पदभार सोपविला. यानंतर राठोड यांना पोलीस विभागाकडून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

नूतन आयजीपी म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर संदीप पाटील यांचे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आगामी काळात उत्तर विभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने नवीन आयजीपी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाकडे पाहिले जात आहे.

नूतन आयजीपी संदीप पाटील हे बेळगावकरांसाठी नवीन नसून यापूर्वी २०१० ते २०१३ या काळात त्यांनी बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून अत्यंत धडाकेबाज कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या जुन्या अनुभवामुळे आणि कडक शिस्तीमुळे आगामी काळात उत्तर परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.पोलीस आयुक्तालय नसतानाही त्यांनी संपूर्ण जिल्ह्यावर आपला कडक वचक ठेवला होता.

त्यांच्या आधीच्या कार्यकाळात त्यांनी सुरू केलेला ‘जनता दर्शन’ हा उपक्रम प्रचंड गाजला होता, ज्याद्वारे गरीब, मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न जागेवर सुटले होते. असे असतानाही त्यावेळी त्यांच्यावर राजकीय दबावर बदली करण्यात आली होती. ही बदली रद्द व्हावी यांच्यावर झालेला अन्याय दूर व्हावा यासाठी बेळगाव येथील हजारो नागरिकांनी यांच्यावतीने निदर्शने करून मोर्चा काढण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!