Uncategorized
Trending

एसीएफ निमबर्गी यांची बदली बसवराज वाळद यांची नियुक्ती 

बेलगाम प्राईड / येथील सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी सुनीता निंमबर्गी यांची धारवाड येथील वनविभागाच्या कार्यालयात बदली झाली असून त्यांच्या जागी बेळगाव येथील वनविभागाचे कार्ययोजना अधिकारी बसवराज वाळद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शुक्रवारी दि. 29 सकाळी वाळद हे पदभार स्वीकारणार आहेत कर्नाटक सरकारच्या वनविभागाच्या राज्यसचिवांनी हा बदलीचा आदेश जाहीर केला आहे. वाळद यांच्या नियुक्तीकडे महत्त्वपूर्ण बदल म्हणून पाहिले जात आहे. वाळद यांनी यापूर्वी खानापूर, लोंढा, आणि नागरगळी विभागात आरएफओ म्हणून काम पाहिले आहे.

आपल्या पूर्वीच्या कार्यकाळात त्यांनी जंगल संवर्धन वनस्पती संरक्षण आणि वनवाढीसाठी प्रभावी कामगिरी केली आहे. दरम्यान बदली झालेल्या सुनिता निमबर्गी यांनी आपल्या कार्यकाळात खानापूर विनविभागाच्या कार्यक्षेत्रात विविध उपक्रम राबवून जंगल संरक्षण व वनवाढीसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!