Uncategorized
Trending

वृद्धापकाळाने जिल्हा रुग्णालयात निधन झालेल्या वृद्धेवर समाजसेवकांनी केले अंत्यसंस्कार 

बेलगाम प्राईड/ मानवतेचा आणि सामाजिक जबाबदारीचा हृदयस्पर्शी परिचय देत, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या आणि वृद्धापकाळामुळे निधन झालेल्या एका अनोळखी वृद्ध महिलेवर अल्लन विजय मोरे अवधूत तुडेकर आणि त्यांच्या टीमने, विजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एपीएमसी पोलीस स्टेशनचे सीपीआय उस्मान आवटी यांच्या सहकार्याने अंत्यसंस्कार करण्यात आला.

मृत महिलेचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ओळख पटण्यासाठी त्याचबरोबर त्यांचे कोणीतरी नातेवाईक पुढे येऊन हा मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन विधी केली जाईल याची वाट पाहण्यात आली मात्र कोणत्याही वारस किंवा नातेवाईक पुढे न आल्याने, त्या दिवंगत आत्म्याला सन्मानाने अंतिम निरोप देण्यासाठी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समन्वयातून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधून सदाशिव नगर स्मशानभूमीत नेहून त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या वेळी एपीएमसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी एम. यडहळ्ळी, अवधूत तुडवेकर, अद्वैत चव्हाण पाटील आणि मायकेल पिंटो उपस्थित होते. तसेच शववाहिका चालक निशार शमशेर, संजय मेत्री, सदाशिव नगर स्मशानभूमीचे कर्मचारी आणि इतर हितचिंतकांनीही सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!