
बेळगाव लाईव्ह : छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गर्लगुंजी येथील मराठी विद्यानिकेतनची विद्यार्थीनी कु.प्रतिज्ञा विनोद कुंभार हिचा विशेष सन्मान करण्यात आला. दहावी परीक्षेत मराठी विषयात १२५ पैकी तब्बल १२४ गुण मिळविल्याबद्दल तिला सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि प्रेरणापुस्तक देऊन शनिवारी (दि. २३) गौरविण्यात आले.
प्रतिज्ञा ही लहानपणापासूनच अभ्यासू आणि गुणवंत विद्यार्थीनी म्हणून ओळखली जाते. तिचे प्राथमिक शिक्षण गावातील सरकारी मराठी मुलींच्या शाळेत झाले. ती गर्लगुंजी ग्रामपंचायतीच्या माजी उपाध्यक्षा रेखा कुंभार आणि प्राथमिक कृषी पतसंस्थेचे संचालक तसेच छायाचित्रकार विनोद कुंभार यांची कन्या आहे.

तसेच ज्येष्ठ नाटककार यल्लाप्पा पालकर यांची नात आहे. प्रतिज्ञाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




