Uncategorized
Trending

शुभम शेळके यांच्या विरोधातील नोटीशीला न्यायालयात आव्हान

बेलगाम प्राईड/ महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी माळमारुती पोलीस स्थानकाच्या तक्रार अर्जानुसार कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 

शुभम शेळके यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये पाच लाख रुपयांचा बॉण्ड व तितक्याच रकमेचे दोन जामीनदार घेऊन पोलीस उपायुक्त यांच्या न्यायालयात उपस्थित राहावे असे कळविण्यात आले होते.

शेळके यांच्या वतीने गुरुवार दिनांक 18 जून रोजी महेश बिर्जे हे उपस्थित राहिले होते. विशेष म्हणजे मध्यवर्ती म. ए. समितीचा  22 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या प्रचारात शुभम शेळके सक्रिय झाल्याने पोलीस प्रशासनाने सदर नोटीस बजावण्याची चर्चा आहे, यापूर्वी देखील शुभम शेळके यांना तडीपार का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी देखील न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सदर नोटीशीला आज शुक्रवार दिनांक 19 जून रोजी वकील महेश बिर्जे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.

यावेळी वकील महेश बिर्जे व शुभम शेळके यांच्यासह कार्याध्यक्ष धनंजय पाटील वकील बाळासाहेब कागलकर वकील वैभव कुट्रे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!