Uncategorized
Trending

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना योग्य पोलीस संरक्षण उपलब्ध द्या 

 

बेलगाम प्राईड/ वरील विषयास अनुसरून, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची नम्र विनंती अशी आहे की, दिनांक 21-07-2026 रोजी बेंगळुरू येथील शिवाजीनगर परिसरात पदपथावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना केंद्रीय शहर महापालिकेच्या दोन महिला अभियंते, जेसीबी चालक व ट्रॅक्टर सहाय्यक यांच्यावर फेरीवाले तसेच विविध संघटनांच्या सदस्यांनी हल्ला केला.

सार्वजनिकांच्या सुरक्षित व सुरळीत पादचारी वाहतुकीसाठी शिवाजीनगर बसस्थानकाजवळील पदपथावरील अतिक्रमण हटविण्याच्या उद्देशाने मंगळवारी सकाळी महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता, काही संघटनांचे सदस्य व रस्त्यावरील विक्रेत्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली, त्यांना ढकलले तसेच हेल्मेट, प्लास्टिकच्या खुर्च्या व इतर वस्तूंनी हल्ला केला.

कर्मचारी तेथून निघून जात असतानाही त्यांचा पाठलाग करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांवर पेपर स्प्रेची फवारणी करण्यात आली.

या घटनेतील संबंधित आरोपींवर कठोर व योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच, यापुढे राज्यातील कोणत्याही महापालिकेकडून अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यापूर्वी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरेसे पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!