Uncategorized
Trending

इंडियन कराटे क्लब, बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या चार विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान 

बेलगाम प्राईड/ मच्छे येथील सप्तपदी मंगल कार्यालय येथे कराटे कलर बेल्ट परीक्षा व ब्लॅक बेल्ट प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या परीक्षेत एकूण 145 कराटेपटूंनी सहभागी होते.

तर टॉप चार ब्लॅक बेल्ट विद्यार्थी प्रेम सुतार, पृथ्वी सुतार, प्रथमेश पाटील आणि अपेक्षा पुजारी या चार विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला.
हे चारही विद्यार्थी गेल्या 9 वर्षांपासून मच्छे शाखेत नियमितपणे कराटेचे प्रशिक्षण घेत असून त्यांनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत अनेक पदके मिळवून संस्थेचे व बेळगावचे नाव उंचावले आहे.
या चारही विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित डॉ. पद्मराज पाटील (आदिवीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक)
सौ. माधुरी जाधव (काँग्रेस साऊथ लीडर) आणि इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष कराटे मास्टर श्री. गजेंद्र काकतीकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचेही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कराटेमुळे शिस्त, आत्मविश्वास, स्वसंरक्षण आणि उत्तम व्यक्तिमत्त्व विकास घडतो, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इन्स्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर तसेच प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, विजय सुतार, हरीष सोनार, रतिक लाड आणि किरण गडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन लक्षिता जांगिड यांनी केले.

तर टॉप चार ब्लॅक बेल्ट विद्यार्थी प्रेम सुतार, पृथ्वी सुतार, प्रथमेश पाटील आणि अपेक्षा पुजारी या चार विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला.

हे चारही विद्यार्थी गेल्या 9 वर्षांपासून मच्छे शाखेत नियमितपणे कराटेचे प्रशिक्षण घेत असून त्यांनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत अनेक पदके मिळवून संस्थेचे व बेळगावचे नाव उंचावले आहे.

या चारही विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित डॉ. पद्मराज पाटील (आदिवीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक)

सौ. माधुरी जाधव (काँग्रेस साऊथ लीडर) आणि इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष कराटे मास्टर श्री. गजेंद्र काकतीकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचेही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कराटेमुळे शिस्त, आत्मविश्वास, स्वसंरक्षण आणि उत्तम व्यक्तिमत्त्व विकास घडतो, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इन्स्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर तसेच प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, विजय सुतार, हरीष सोनार, रतिक लाड आणि किरण गडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन लक्षिता जांगिड यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!