पात्र वार्ताहरांची नावे पडताळून आरोग्य विमा सुविधा द्यावी/ दैनिक पत्रकार संघटनेची मागणी

१५ जुलै २०२६
बेलगाम प्राईड/ महानगरपालिका हद्दीत कार्यरत असलेल्या मुद्रित माध्यमांच्या वार्ताहरांना दिली जात असलेली आरोग्य विमा सुविधा यंदाही सुरू ठेवावी, अशी मागणी मुद्रित माध्यम संघटनेने केली आहे.
यासंदर्भात महापौर, उपमहापौर आणि महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेऊन महानगरपालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.
ही योजना सातत्याने सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करणारे मंत्री, आमदार, महापौर, उपमहापौर, नगरसेवक तसेच महानगरपालिका आयुक्त यांचे संघटनेने आभार मानले आहेत.
चालू वर्षाच्या आरोग्य विम्याची मुदत संपल्याने त्याचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया महानगरपालिकेने सुरू केली असून, त्यामुळे पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, महानगरपालिका हद्दीत प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या दैनिक पत्रकारांना नावे योग्य प्रकारे पडताळून, केवळ पात्र पत्रकारांनाच या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व कल्याणाच्या दृष्टीने या मागणीचा सकारात्मक विचार करून आरोग्य विमा सुविधा लवकरात लवकर सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती संघटनेने केली आहे.




