Uncategorized
Trending

बाबा कालिदास महाराजांनी खडक गल्लीच्या राजाचे घेतले दर्शन

बेलगाम प्राईड/ बाबा कालिदास महाराजांनी बेळगावात येऊन खडक गल्लीतील मंदिरात प्रवेश करून देवीचे दर्शन घेतले यानंतर खडक गल्लीच्या राजाच्या मंडपात येऊन मंडळाला भेट देऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करून समाजात बंधुभाव, सद्भावना आणि अखंडता कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकीची ताकद वाढवून समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगावातील खडक गल्ली येथील ‘बेळगावचा मानाचा राजा’ गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या हस्ते गणपती बाप्पांना आरती करण्यात आली यानंतर मंडळाच्या वतीने महाराजांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी गल्लीतील नागरिक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबा कालिदास महाराजांनी खडक गल्लीच्या गणपतीला सिद्धपीठ आणि सिद्धस्थळ संबोधत गणरायाची स्तुती केली. याप्रसंगी माजी आमदार अनिल बेनके, विश्वजीत चौगुले संजय जाधव विजय जाधव विजय देवगेकर संजय जाधव यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!