बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना श्री गणेश शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न
ग्रामीण विभाग मधून १८० स्पर्धकांचा सहभाग

बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक, मार्केट आयोजित कै. पुंडलिक हंगिरगेकर फौंडेशन पुरस्कृत २२ व्या श्री गणेश ग्रामीण विभागीय स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
भाग्यनगर येथील रामनाथं मंगल कार्यालयाच्या सभागृहात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.प्रारंभी हनुमान मूर्तीचे व गणेशमूर्तीचे पूजन करण्यात आले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या सामनावीर विजय स्पर्धकाला मिहीर पोतदार यांनी 30,000 ची रोख रक्कम घोषित करण्यात आली.

या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनचे अध्यक्ष अविनाश पोतदार, श्रीधर शेट्टी, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, उद्योजक मिहीर पोतदार, गौतम सामंत, नविनकुमार, सुहास चांडक, ईश्वर घाडी, विजय तलवार, सचिन उसुलकर, सदानंद शिरोडकर, शेखर नागरडोळेकर, राकेश कलघटगी, मि. इंडिया सुनील आपटेकर, किशोर आगा, पुरस्कर्ते सचिन हंगिरगेकर, अमित किल्लेकर, गंगाधर व हेमंत हावळ, आशिया पंच अजित सिद्दण्णावर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

सदर स्पर्धेत आयबीबीएफच्या नियमानुसार ५५ किलो, ६०, ६५, ७०, ७५ व ७५ वरील गटात स्पर्धा घेण्यात आल्या प्रथम ग्रामीण विभागीय स्पर्धेत यावर्षी विक्रमी आकडा गाठला १८० स्पर्धकांनी वरील गटात भाग घेतला तर श्री गणेश स्पर्धेत जवळपास १०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग होता. यावेळी बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेत पिळदार शरीरसृष्टी आपली प्रात्यक्षिके सादर केली यामध्ये प्रत्येक गटातील पाच शर्यश्रेष्ठ पट्टूंची निवड करण्यात आली या निवडीतून प्रत्येक ग्रुप मधील प्रथम आलेल्या शरीर सौष्ठव मधून टायटल साठी स्पर्धा घेण्यात आली यामध्ये जिल्ह्याचा टायटल विजयी स्पर्धक प्रवीण मजुकर तर ग्रामीणचा टायटल विजयपटू सुनील भातकांडे हे विजयी ठरले आहेत.




