
बेलगाम प्राईड/ बेंगळुरू : बेंगळुरूच्या जयनगर येथील नागनूर श्री शिवबसव स्वामीजी कल्याण केंद्राच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘गुरुभवन’च्या उद्घाटन समारंभाला माजी मंत्री व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थिती लावली.
डंबळ-गदग येथील एडेयूर संस्थान मठाचे डॉ. तोटद सिद्धराम महास्वामी यांच्या दिव्य सान्निध्यात हा कार्यक्रम पार पडला. नागनूर श्री रुद्राक्षी मठाचे श्री डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या समारंभाला आमदार महांतेश कौजलगी, आमदार बाबासाहेब पाटील, महांतेश बिरादार, कल्याण केंद्राचे सचिव शंभू हिरेमठ यांच्यासह विविध मान्यवर आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.




