हिवाळी अधिवेशनाची समन्वयाने तयारी करा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची सूचना
निवास, वाहतूक, सुरक्षा, आरोग्य सुविधांचे काटेकोर नियोजन करा

बेलगाम प्राईड/ सुवर्णविधानसौध येथे होणारे आगामी हिवाळी अधिवेशन यशस्वी व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय राखून काम करावे. अधिवेशनासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, मान्यवर, अधिकारी व माध्यम प्रतिनिधींना आवश्यक सुविधा उपलब्ध करूत्त देताना कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी आयोजित हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले, अधिवेशनाच्या आयोजनासाठी विविध समित्या, उपसमित्या स्थापन करण्यात येणार असून संबंधित
अधिकाऱ्यांना सूचना देताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, बाजूला इतर.अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्या वेळेत पूर्ण कराव्यात. अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी आतापासूनच नियोजनबद्ध पद्धतीने कामाला सुरुवात करावी, असे त्यांनी स्पष्ट केले
अधिवेशनासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व अन्य मान्यवरांच्या स्वागतासह निवास, भोजन आणि वाहतुकीची योग्य व्यवस्था करण्यात यावी. निवासासाठी निश्चित केलेल्या हॉटेलच्या मालकांशी चर्चा करून आवश्यक खोल्यांचे आरक्षण वेळेत पूर्ण करावे. मान्यवरांच्या शिष्टाचारात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी संबंधित विभागांनी विशेष दक्षता घ्यावी, अशी
सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सुवर्णविधानसौध येथे अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीत इंटरनेट सेवा अखंडित सुरू राहील, याची खात्री करावी. अधिवेशनासाठी येणारे मान्यवर, अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या निवासाच्या ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय पथके तैनात ठेवावीत. आवश्यकवेळी तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध होईल, अशी व्यवस्था आरोग्य विभागाने करावी. अधिवेशनाशी संबंधित सर्व सुविधांची पाहणी करून संभाव्य अडचणी आधीच दूर कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
आयोजनात अधिवेशनाच्या कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडून इतर विभागांशी समन्वय साधावा. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून हिवाळी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी पोलीस आयुक्त प्रकाश निकम, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.




