Uncategorized
Trending

राष्ट्रीय स्तरावरील गणेशोत्सव स्पर्धेत ‘राजहंस गल्लीचा राजा’ला द्वितीय क्रमांक

बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धेत उल्लेखनीय यश

बेलगाम प्राईड/ बेळगावच्या गणेशभक्तांसाठी अभिमानाची बाब असून, श्री राम युवक मंडळाच्या ‘राजहंस गल्लीचा राजा’ गणेशोत्सवाला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा २०२६’मध्ये या मंडळाने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या यशामुळे बेळगावच्या गणेशोत्सव परंपरेचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा उंचावला आहे. भक्तीभाव, सामाजिक एकता, सामाजिक बांधिलकी आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा यांचा सुंदर संगम साधणाऱ्या ‘राजहंस गल्लीचा राजा’ने आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, समाजातील एकोपा, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढवणारा महत्त्वपूर्ण उत्सव आहे. या मूल्यांचे दर्शन घडवणाऱ्या श्री राम युवक मंडळाच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दाद बेळगावसाठी अभिमानास्पद ठरली आहे.

‘राजहंस गल्लीचा राजा’ला मिळालेल्या या यशामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाने बेळगावच्या सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, शहराचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर उजळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!