Uncategorized
Trending

बेळगावच्या ज्येष्ठ जलतरणपटूंची उत्कृष्ट कामगिरी १ सुवर्ण,२ रौप्य आणि १ कांस्य पदकाचा समावेश

बेलगाम प्राईड/ बेंगळुरू येथे झालेल्या दुसऱ्या आशियाई मास्टर्स जलतरण स्पर्धेत बेळगावच्या ज्येष्ठ खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत तेराशेहून अधिक स्पर्धकानी भाग घेतला होता.

बेळगावच्या खेळाडूंनी एकूण चार पदके पटकावत क्रीडा क्षेत्रात बेळगांव शहराचे नाव उज्वल केले आहे. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे. दस्तगीरसाब अत्तार यांनी दोनशे मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. बलवंत पत्तार यांनी दोनशे आणि चारशे मीटर फ्रीस्टाइल प्रकारात दोन रौप्य पदके मिळवली. तसेच लक्ष्मण कुंभार यांनी पन्नास मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे.

बेळगावमधील सुवर्ण जेएनएमसी ऑलिम्पिक साईज जलतरण तलावात या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येते. मुख्य मार्गदर्शक उमेश कलघटगी यांच्यासह प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. या यशाबद्दल विविध मान्यवरांनी खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!