भाग्यनगर भागातील मटण दुकानातील 10 मेंढ्यांच्या चोरीप्रकरणी तिघांना अटक
तिघां आरोपी कडून 3.17 लाखांचा मुद्देमाल जप्त; टिळकवाडी पोलिसांची कारवाई

बेलगाम प्राईड/ टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाग्यनगर परिसरातील एका मटन शॉप मधून 10 मेंढ्यांची चोरी करून कार गााडीतू पलायन करण्यात आले होते. या प्रकरणी तिघांना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक कार आणि रोख रकमेसह एकूण 3 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भाग्यनगर परिसरातून 10 मेंढ्या चोरीला गेल्याची तक्रार टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 110/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाच्या तपासासाठी बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त तसेच खडेबाजार उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी आश्चाक खाजासाब साटी (वय 42), मोहम्मद उबेद फयाज डोणी (वय 19) आणि मोहम्मदकैफ अय्युबखान मसरगुप्पी (वय 20) या तिघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे :
मोहम्मद उबेद फयाज डोणी याच्याकडून 3 हजार रुपये रोख मोहम्मदकैफ अय्युबखान मसरगुप्पी याच्याकडून 4 हजार रुपये रोख,पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट VDI कार (क्र. KA-23-M-8448) — अंदाजे 2 लाख रुपये, आश्चाक खाजासाब साटी याच्याकडून 1 लाख 10 हजार रुपये रोख अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 3 लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत टिळकवाडी पोलीस निरीक्षक परशुराम पूजारी, PSI विश्वनाथ घंटामठ, PSI अडिवेप्पा कुंडेद तसेच पोलीस कर्मचारी महेश पाटील, एस. एम. करलिंगण्णवर, लाडजिसाब मुल्तानी, नागेंद्र तळवार, परमानंद पवार, गंगा पार्वती आणि टेक्निकल सेलचे कर्मचारी रमेश अक्की व महादेव खासीद यांनी सहभाग घेतला.
या पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी कौतुक करून पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे.




