Uncategorized

महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी आमदार अभय पाटील यांचा पुढाकार; शिलाई मशीनचे वितरण

घरबसल्या व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा; महिलांना आमदार अभय पाटील यांचे आवाहन

बेलगाम प्राईड/ महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, या उद्देशाने बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्या पुढाकारातून मतदारसंघातील देवांग समाजासह इतर समाजातील पात्र महिला लाभार्थींना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.

महिलांना घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात भर घालता यावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. केवळ शिलाई मशीन देणे एवढ्यापुरता हा उपक्रम मर्यादित नसून, महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी आमदार अभय पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन करताना, शासनाच्या आणि विविध विकास महामंडळांच्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असे त्यांनी सांगितले.

या शिलाई मशीन वितरण सोहळ्याला मोठ्या संख्येने महिला लाभार्थी उपस्थित होत्या. शिलाई मशीन मिळाल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत होते. अनेक महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार अभय पाटील यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!