
बेलगाम प्राईड/ ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचकी वरील चालक युवती या अपघातात थोडक्यात बचावली ही घटना सोमवारी सकाळी जुना पीबी रोडवरील ओमनगरच्या वळणावर सकाळी घडली.
जुने बेळगावकडून येणारी टिप्पर ओमनगरकडे वळत असताना समोरून येणारी दुचाकी टिप्परच्या मागील चाकाखाली अडकली. आणि हा अपघात घडला.
मात्र, सुदैवाने दुचाकी वरील युवती बाजूला पडल्याने तिचा जीव वाचला, तर दुचाकी चाकाखाली अडकली अपघातानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. केवळ दैव बलवत्तर असल्याने युवती या अपघातातून सुखरूप बचावली.




