
बेलगाम प्राईड / झोपेत कारगाडी चालवत समोरील दुचाकी व इनोव्हा कारला ठोकल्याने झालेल्या अपघातात दोघेजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे राष्ट्रीय महामार्ग सुवर्ण विधान सौधा समोर घडली. या अपघातात असिफ मौलासाब हेबाळी (वय 30) रा.विरापूर ता. बेळगाव कित्तूर, अभिषेक सोमचंद्र रायकर (वय 25) रा. वडगाव खासबाग असे अपघातात मयत पावलेल्या दोघांची नावे आहेत. तर मौलासाब हेबाळी (वय 52)हे अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अभिषेक रायकर हा युवक इव्हेंटचे कार्यक्रम करत असून शनिवारी रात्री कित्तूर नजीक कार्यक्रम करून पहाटे बेळगावला आपल्या कार क्रमांक के ए 22 एन 4076 मारुती अल्टो या कारमधून येथे वेळी पहाटेच्या वेळी समोरून जात असलेल्या दुचाकी क्रमांक के ए 22 डब्ल्यू 2269 या दुचाकीला ठोकल्याने तर यानंतर दुभाजकावरून जाऊन समोरून येणाऱ्या इनोव्हाकार क्रमांक के ए 22 एमडी 1586 याला ठोकल्याने हा तिहेरी अपघात घडला.
या अपघाताची माहिती बागेवाडी पोलीस संकात कळताच पोलीस घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आला.या अपघातात दुचाकी वरील असिफ हेब्बाळी व मौलासाब हेब्बाळी मुलगा व वडील हे दोघेही गंभीर जखमी झाले. यामधील मुलगा सोमवारी पहाटे निधन झाला आहे. या घटनेचा गुन्हा बागेवाडी पोलीस स्थानकात नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.




