Uncategorized
Trending

वडगाव विभागातील पारंपरिक श्री शिवजयंती भव्य मिरवणूक सोमवारी

पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी मिरवणूकी संदर्भात चर्चा

बेलगाम प्राईड/ वडगाव परिसरातील श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी भव्य पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत एकूण 7 जिवंत चित्ररथ (लाईव्ह देखावे) सादर करण्यात येणार असून, मिरवणूक रात्री 8 वाजल्यानंतर सुरू होऊन वडगावमधील सर्व गल्ली बोळांमधून फिरणार आहे.

या संदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. 15) सायंकाळी 6 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन मिरवणुकीबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी पोलीस आयुक्तांनी मिरवणुकीच्या उद्घाटन पूजेसाठी उपस्थित राहण्यास सहमती दर्शवली आहे.यावेळी उपायुक्त नारायण बरमणी यांचीही भेट घेण्यात आली.

या भव्य मिरवणुकीमुळे वडगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बैठकीदरम्यान वडगाव -जुने बेळगाव शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी श्री. मनोहर हलगेकर, श्री. महेश जुवेकर, श्री. अमोल देसाई, श्री. ज्ञानेश्वर मन्नूरकर, श्री. विजय हलगेकर, श्री. भाऊराव पाटील, श्री. मंगेश नागोजीचे, श्री. निलेश कुंदेकर, श्री. सुशांत यल्लुपाचे, श्री. सचिन आजरेकर, श्री. हरी यलजी तसेच मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळचे जनसंपर्क प्रमुख श्री. विकास कलघटगी, त्याचबरोबर पाटील गल्ली, कारभार गल्ली, विष्णू गल्ली, वझे गल्ली, सोनार गल्ली, दत्ता गल्ली मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!