
बेलगाम प्राईड/ बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या परिसरात १६ व्या भैरव बटालियनचा स्थापना दिन साजरा करण्यात आला.
भैरव पथकाच्या परेडची मानवंदना स्वीकारल्यानंतर एमएलआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी भैरव बटालियनच्या नव्या अधिकाऱ्यांना ध्वज हस्तांतरित केला.मराठा लाईट इन्फंट्रीचे वरिष्ठ अधिकारी, एनसीसी कॅडेट्स तसेच सैनिकांच्या कुटुंबीयांनी या कार्यक्रमात सहभाग करून घेतले

यानंतर बोलताना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी म्हणाले की, देशाच्या संरक्षणासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्रीचे सैनिक युद्धकलेत प्रवीण असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सदैव सज्ज असतात. नव्याने स्थापन झालेली भैरव बटालियन विशेष प्रशिक्षण घेतलेले आणि आधुनिक युद्धकौशल्य आत्मसात केलेले सक्षम सैनिक असल्याचा त्यांना अभिमान आहे.
देशाची सुरक्षा आणि अंतर्गत स्थैर्य राखण्यासाठी भैरव बटालियनचे सैनिक कठीण आव्हानांना समर्थपणे सामोरे जातात आणि शत्रूला योग्य प्रत्युत्तर देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. धैर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेत भैरव पथक अग्रस्थानी असल्याचा विश्वास ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी व्यक्त केला.




