
बेलगाम प्राईड/ शासनावतीने सोपविण्यात आलेल्या सर्वात महत्त्वाच्या जनगणनेचे काम नियोजित वेळेच्या एक आठवडा आधी पूर्ण करून ते यशस्वी केले आहे.याबद्दल आयुक्त कार्तिक एम. यांनी आज सोमवारी महानगरपालिकेच्या जनगणना अधिकाऱ्यांचा सत्कार केला.
महापालिकेच्या कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना आयुक्त कार्तिक एम म्हणाले,मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जनगणना, निवडणुका, पल्स पोलिओ आणि कोरोनाच्या काळात अंतर्गत प्रशासकीय यंत्रणेत सैनिकांप्रमाणे काम केले आहे. हीच देशसेवा आहे.जनगणना कामात गुंतलेल्या अधिकारी, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी आणि कडक उन्हात एकमेकांना सहकार्य करत अत्यंत कमी कालावधीत जनगणनेचे काम यशस्वी केले आणि ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत.
जनगणनेच्या कार्यात एक हजार कर्मचारी आणि १५० मतदान कर्मचारी सहभागी झाले होते. जनगणनेच्या कामात एकूण एक हजार दोनशे कर्मचाऱ्यांनी काम केले.यासाठी आठ ब्लॉक तयार करण्यात आले.
५० जणांची एक तुकडी तयार करण्यात आली आणि ७ अधिकाऱ्यांना ३ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. सात प्रभारी अधिकारी पर्यवेक्षक होते.आयुक्तांचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांच्या चांगल्या नेमणुकीमुळे हे काम यशस्वी झाले, असे शहर जनगणना अधिकारी, उपआयुक्त (महसूल) डॉ. सिद्दू हुल्लोळी यांनी सांगितले.प्रशासकीय विभागाचे उपआयुक्त उदयकुमार तळवार यावेळी उपस्थित होते.




