Uncategorized
Trending

वरेरकर नाट्य संघात आता तबला व गिटार वादन वर्ग

बेलगाम प्राईड/ टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघात आता विशाल मोडक यांच्या तरंग अकादमीतर्फे तबला व गिटार वादन वर्ग सुरू करण्यात येत आहेत. वरेरकर नाट्य संघाचे कार्यवाह जगदीश कुंटे यांच्या हस्ते फीत कापून वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मराठी ट्रेनिंग कॉलेजचे निवृत्त शिक्षक सुरेश नाझरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना कुंटे म्हणाले, ” साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत, नृत्य आणि चित्रकला अशा सर्व कलाक्षेत्रातील उपक्रम येथे चालू आहेत. त्यामुळे एक सर्वसमावेशक सांस्कृतिक केंद्र म्हणून वरेरकर नाट्य संघाची वाटचाल सुरू आहे. रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा.”

या प्रसंगी विशाल मोडक यांनी स्वागत केले. समीरा मोडक आणि विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हटली. अनेक कलारसिक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. सोमवार व बुधवारी गिटार तर मंगळवार आणि गुरुवारी तबला वादन शिकविण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!