
बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यात नवजात बालक कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकल्याची धक्कादायक घटना
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील कित्तूर गावाजवळ कित्तूर–नरगुंद मार्गावरील बसवणकट्टी पुलाखाली एका नवजात बालकाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मेंढपाळांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नवजात बालकाची सुटका केली आणि संबंधित प्रशासनाला याची माहिती दिली. यानंतर बाळाला उपचारासाठी सौदत्ती येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, नवजात बालकाला अशा अवस्थेत टाकून देणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.




