Uncategorized
Trending

म.ए.युवा समिती बेळगाव वतीने येत्या रविवारी दहावी परीक्षेतील गुणवंतांचा विद्यार्थ्यांचा सत्कार 

बेलगाम प्राईड/ महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये मराठी माध्यमात बेळगाव शहर,बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातून प्रत्येकी पहिला , दुसरा आणि तिसरा क्रमांक घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, ओरिएंटल शाळेजवळ खानापूर रोड, बेळगाव येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून प्रा.सरिता सतीश पाटील या मार्गदर्शन करणार आहेत. 

तर सर्व म.ए. समिती आणि युवा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे

खानापूर तालुक्यातील विद्यार्थी                              प्रथम क्रमांक : जान्हवी शामराव पाटील (राज्यात मराठी माध्यमात प्रथम) दुसरा क्रमांक : निकिता लक्ष्मण चौरी, तिसरा क्रमांक : सोनाली तुकाराम दळवी

बेळगाव ग्रामीण विभागातील विद्यार्थी.                    प्रथम क्रमांक : प्राजक्ता उत्तम चौगुले, द्वितीय क्रमांक : पल्लवी सुरज पाटील, तृतीय क्रमांक : समीक्षा लक्ष्मण कोवाडकर

बेळगाव शहर विभागातील विद्यार्थी                        प्रथम क्रमांक : सोहम सतीश हळदणकर, द्वितीय क्रमांक : स्नेहा यल्लाप्पा हिरोजी, तृतीय क्रमांक : अनिकेत बाळकृष्ण जाधव

या विद्यार्थ्यांना शाल, स्मृतिचिन्ह, पुस्तके, रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!