Uncategorized
Trending

गोकाक धबधबा’चे मनमोहक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी

५ जुलै २०२६

बेलगाम प्राईड/ पावसाळ्यातील मनमोहक आणि रौद्र सौंदर्याने नटलेला गोकाक धबधबा पर्यटकांना आकर्षित बनला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध नायगारा धबधब्याप्रमाणे घोड्याच्या नालाच्या आकाराची रचना असल्यामुळे गोकाक धबधब्याला “भारताचा नायगारा” असेही संबोधले जाते.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम घाट तसेच घटप्रभा नदीच्या जलसंकलन क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध गोकाक धबधबा आणि गोडचिनमळकी धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होत असून, त्यांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी करत आहेत.

कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धबधबा म्हणून गोकाक धबधबा ओळखला जातो. घटप्रभा नदीवर निर्माण झालेला हा धबधबा सुमारे १८० फूट उंचीवरून कोसळतो. त्याचे नयनरम्य दृश्य पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

धबधब्याजवळ असलेला झुलता पूल हे येथील आणखी एक प्रमुख आकर्षण आहे. या पुलावर उभे राहून धबधब्याचे विहंगम दृश्य अनुभवता येते. सध्या मुसळधार पावसामुळे धबधबा दुथडी भरून वाहत असून तो पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनला आहे.

गोडचिनमळकी धबधबा

गोकाक धबधब्याला भेट देणाऱ्यांनी गोडचिनमळकी धबधब्यालाही अवश्य भेट द्यावी. गोकाक धबधब्यापासून अवघ्या ९ किलोमीटर अंतरावर हा निसर्गरम्य धबधबा आहे.

मार्कंडेय नदीवर निर्माण झालेला हा नैसर्गिक धबधबा लालसर छटा असलेल्या खडकांवरून वेगाने कोसळताना अत्यंत मोहक दिसतो. गेल्या महिनाभरापासून हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत असून, पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत.पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!