Uncategorized
Trending

कॉसमॉस को-ऑप. बॅंकेतर्फे स्त्री सन्मान सोहळा 

बेलगाम प्राईड: येथील कॉसमॉस को-ऑप. बॅंकेच्या मारुती गल्ली शाखेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त १२ मार्च रोजी स्त्री सन्मान सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त विशेष उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. व्यवस्थापक यदुनाथ नाईक अध्यक्षस्थानी होते.

कवयित्री प्राचार्या मनिषा नाडगौडा, विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीच्या सेक्रेटरी पद्मा बाडकर, कर्मचारी अर्चना दरवंदर, बेळगांव अर्बन को-ऑप. सोसायटीच्या नेहा नरगुंदकर, अनिता जकाती, उमा मांडके यांचा यदुनाथ नाईक व रुपाली हवालदार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय समारोप करताना नाईक यांनी महिला दिनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास बॅंकेचे कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!