Uncategorized
Trending

बेळगाव महापालिकेत भ्रष्टाचाराचा स्फोट – “पैसे द्या, नाहीतर फाईल रद्द” अशा नागरिकांना धमक्या

बेलगाम प्राईड/बेळगाव महापालिकेच्या दक्षिण विभाग कार्यालयात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराने शहरात खळबळ उडवली आहे. वरिष्ठ नागरिकांना लक्ष्य करून उघडपणे पैशांची मागणी केली जात असल्याचे गंभीर आणि धक्कादायक आरोप समोर आले आहेत.

विभागीय आयुक्त आणि त्यांचे निकटवर्तीय अमित गंथडे यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले असून, ई-अस्ती खात्याच्या प्रक्रियेसाठी नागरिकांकडून उघडपणे पैसे उकळले जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. “पैसे दिल्याशिवाय फाईल पुढे सरकणार नाही, नाहीतर फाईल रद्द केली जाईल” अशा उघड धमक्या दिल्या जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याहूनही गंभीर बाब म्हणजे, वरिष्ठ नागरिकांशी अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप आहे. आवश्यक कागदपत्रे पूर्ण असतानाही “दस्तऐवज अपूर्ण आहेत” असे सांगून नागरिकांना वारंवार कार्यालयात चकरा मारून चपला जिजवण्याची वेळ आली आहे. यामुळे सामान्य नागरिक संतापले आहेत.

दरम्यान, विभागीय आयुक्तांनी स्वतःचा अधिकृत लॉगिन अमित गंथडे यांना दिल्याचा गंभीर आरोपही समोर आला आहे. त्यामुळे गंथडे हे कार्यालयात सर्वाधिकार असल्यासारखे वागत असून, दोघांनी मिळून संपूर्ण दक्षिण विभाग कार्यालयाला वसुलीचे केंद्र बनवले असल्याची जोर चर्चा सुरु आहे.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार झेड के. कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून कठोर चौकशीची मागणी केली आहे. सध्या शहरात एकच सवाल घुमतो आहे – “महापालिका जनतेची सेवा करते की वसुलीचा व्यवसाय?” प्रशासन यावर तातडीने कारवाई करणार का?

की हा प्रकार असाच सुरू राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!