Uncategorized
Trending

निलजी सरकारी मराठी शाळेचा शतक महोत्सव कार्यक्रम उत्साहात 

बेलगाम प्राईड/ टाळ मृदंगाची साथ, मनात मराठी भाषा व मराठी शाळेचा अभिमान, हातात भगवे ध्वज, भगवे फेटे, भगव्या साडीत लेझीम खेळणार्‍या शाळकरी मुली, भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहिद भगतसिंग, यांच्यासह अनेक महापुरूषांच्या वेशभुषेत दींडीत सहभागी झालेले विद्यार्थी, मराठी भाषा प्रेमींची मने वेधून घेत होती. गावातून शतक महोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित प्रबोधन दिंडीचे पूजन व उद्घाटन ॲड. रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ही दिंडी मोठ्या उत्सापुर्ण मराठीमय वातावरणात पार पडली.

निलजी येथील सराकरी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या शतकमहोत्सव कार्यक्रम आज रविवार दि.12 रोजी रामदेव गल्ली येथील कवी श्रेष्ट कुसुमाग्रज सभामंडपात मोठ्या थाटात पार पडला.

प्रारंभी लक्ष्मीबाई पाटील यांच्या हस्ते कवी श्रेष्ट कुसुमाग्रज सभामंडपाचे उध्दघाटन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थींनींनी इशस्ववन व स्वागतगीत सादर केले. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबाराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. यानंतर व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी अ‍ॅड. लक्ष्मण पाटील होते. तर व्यासपीठावर खासदार जगदीश शेट्टर, महाराष्ट्रातील राष्ट्रीय वक्ते राहुल गिरी,शिवराज जाधव, मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे, चंद्रकांत पाटील, लक्ष्मीबाई पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, डॉ. अमर पाटील, अमर के. पाटील, म. ए. समिती कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, किशोर गोमाण्णाचे, रामचंद्र मोदगेकर, शशिकला जाधव, अंकुश केसरकर यांच्यासह शाळेचे माजी शिक्षक उपस्थित होते.

यावेळी रामचंद्र मोदगेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल, पुष्पहार व स्मृतीचिन्ह देउन सत्कार करण्यात आला. यावेळी रमाकांत कोडुस्कर, मालोजीराव अष्टेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार सी. वाय. पाटील यांनी केले. प्रमुख व्यक्ती राहुल गिरी यांनी आपल्या भाषणात मराठी अस्मिता आपल्या माय मराठी भाषेत शिक्षणाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!