
बेलगाम प्राईड /गेल्या दोन दशकापासून तुरमुरी येथे सुरू असलेला कचरा डेपो विरोधात पश्चिम भागातील ग्रामस्थांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला तुरमुरी, उचगाव, कल्लेहोळ, बाची, हिंडलगा, सुळगा, मन्नूर, आंबेवाडी परिसरातील हजारो ग्रामस्थांनी भर उन्हात शुक्रवारी विराट मोर्चा काढत कचरा डेपो तात्काळ बंद आणि स्थलांतर करण्याची जोरदार मागणी केली.
सकाळी दहा वाजता सरदार मैदानावर नागरिक जमा होऊन दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली कचरा डेपो बंद करा नाहीतर स्थलांतरीत करा, कचरा हटाव आरोग्य बचाव अशा घोषणा देत चन्नम्मा सर्कल येथून जिल्हाधिकाऱ्यालावर हा मोर्चा नेण्यात आला. मोर्चेकरांच्यावतीने पुंडलिक बेळगावकर आणि दलित नेते सिद्धाप्पा कांबळे यांनी कचरा डेपोमुळे वीस वर्ष नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

यामुळे आरोग्याच्या समस्या दुर्गंधी पर्यावरणीय हानी या भागातील शेतीचे नुकसान यामुळे जीवनमान घालवण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मोर्चासमोर यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी हजर होऊन नागरिकांची थेट संवाद साधला दोन महिन्याभरात टप्प्याटप्प्याने कचरा कमी करण्याचे आश्वासन दिले तसेच तुरमुरी येथे येणारा ओला व सुखा कचरा 40 ते 50 टक्क्यांनी कमी करण्यात येईल उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
त्याचबरोबर उत्तर-दक्षिण व ग्रामीण या भागातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कचरा डेपोसाठी जागा निश्चित केले जाईल असा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




