शिवजयंती चित्ररथ महामंडळाची उद्या महत्त्वपूर्ण बैठक;
स्पर्धा व चित्ररथ मिरवणूक नियोजन संदर्भात चर्चा

बेलगाम प्राईड/ शहर व उपनगरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित सजीव देखावे सादर करून बेळगावकरांना आकर्षित केले जाते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजयंतीचे नियोजन करण्यासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे रविवारी (दि.11 एप्रिल) महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक धर्मवीर संभाजीराजे चौक येथील दुर्गादेवी मंदिर, जत्तीमठ येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. बैठकीत शिवजयंती चित्ररथ स्पर्धा आयोजित करण्याबाबत चर्चा होणार असून, चित्ररथ मिरवणूक मार्गावरील विविध समस्या, उत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनांवरही विचार विनिमय केला जाणार आहे.
या बैठकीस शहर व उपनगरातील सर्व शिवजयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष सुनिल जाधव, गुणवंत पाटील, सरचिटणीस जे.बी.शहापुरकर, उपाध्यक्ष प्रसाद मोरे, संतोष कणेरी, रवींद्र जाधव, विनायक बावडेकर, अरुण पाटील, निहाल शहापूरकर, आदित्य पाटील आणि आकाश हंडे यांनी केले आहे.




