Uncategorized

गांजा विक्री करणारे तिघे युवक टिळकवाडी पोलिसांच्या ताब्यात

बेलगाम प्राईड/ नानावाडी येथे सार्वजनिक ठिकाणी गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघा युवकांना टिळकवाडी पोलिसांनी काल अटक करून त्यांच्या जवळील 448 ग्रॅम गांजासह एकूण 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मंगेश दयानंद तळेकर (वय 29)रा. क्रांतीनगर गणेशपुर विजय चंद्रपाल चव्हाण (वय 26) रा. गणेशपुर, संदीप मारुती घोटगे (वय 20) रा. सावगाव अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही जण सोमवारी नानावाडी येथील रायकर फर्निचर जवळ सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी गांजाची विक्री करत होते.

त्यावेळी टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून तिघाही आरोपींना रंगेहात पकडले. तसेच त्यांच्या जवळील 20 हजार रुपये किमतीचा 448 ग्रॅम गांजा, 20 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी आणि 5 हजार रुपयांचा मोटोरोला मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!