पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १० रोजी इतिहास रचणार
सर्वाधिकार पंतप्रधान पद भूषवणारे पंतप्रधान ठरणार नरेंद्र मोदी

बेलगाम प्राईड :नवी दिल्ली/ भारतीय राजकारणातील एक ऐतिहासिक तारीख म्हणजे 10 जून 2026 ही इतिहास रचणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढणार असून भारताचे सर्वाधिक काळ पदावर राहिलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी 2014 पासून पंतप्रधान म्हणून देशाची नेतृत्व करत आहेत. या काळात 4399 दिवस पूर्ण झाल्यावर एक नवीन विक्रम प्रस्थापित होईल.
नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली 10 जून 2026 रोजी त्यांच्या कार्यकाळाचे 4,399 दिवस पूर्ण होतील या दिवसानंतर ते पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या 4398 दिवसाचा विक्रम मोडतील पंतप्रधान मोदींनी यापूर्वी इंदिरा गांधी यांना पण मागे टाकले आहे. देशात पहिली लोकसभा 17 एप्रिल 1952 रोजी स्थापन झाली त्यानंतर नेहरूंनी 13 मे 1952 ते 27 मे 1964 पर्यंत जवळपास सलग बारा वर्षे देशाचे नेतृत्व केले हा विक्रम आज पर्यंत कायम होता.पण आता तो मोडला जाणार आहे.

पहिल्या लोकसभेच्या स्थापनेपूर्वीही पंडित नेहरूंनी पंतप्रधान म्हणून देशाची नेतृत्व केले होते. मोदींनी सर्वाधिक सलग कार्यकाळासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना यापूर्वीच मागे टाकले आहे. इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 पर्यंत सलग 4,077 दिवस पंतप्रधान म्हणून पद भूषविले मोदिनी जुलै 2025 मध्ये इंदिरा गांधींचा हा विक्रम मोडला आहे.
नरेंद्र मोदींचे आणखीन एक नवीन विक्रम
नरेंद्र मोदी यांनी पूर्ण बहुमतासह सलग दोन सरकारचे नेतृत्व केले आहे. शिवाय गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांचा एकूण प्रशासकीय अनुभव 8,900 दिवसापेक्षा जास्त आहे.




