बेळगावच्या अमन सुणगारची जलतरण स्पर्धेत चमक
७ पदकांची कमाई राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

बेलगाम प्राईड/ बेळगाव येथील जैन हेरिटेज जैन फ्री युनिव्हर्सिटी महाविद्यालय मधील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेचा विद्यार्थी अमन वसुंधरा अभिजित सुणगार याने बेंगळुरू येथे आयोजित कर्नाटक राज्य जलतरण स्पर्धेत अजिंक्यपद पटकावून उत्कृष्ट कामगिरी करत २ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण ७ पदके जिंकली.
अमनने १०० मीटर आणि २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदके पटकावली. तसेच ५० मीटर बॅकस्ट्रोक, ५० मीटर फ्रीस्टाईल आणि ४×१०० मीटर मेडले रिले या प्रकारांत रौप्यपदके मिळवली. याशिवाय ४×१०० मीटर फ्रीस्टाईल रिले आणि ४×२०० मीटर फ्रीस्टाईल रिले स्पर्धांमध्ये कांस्यपदके जिंकली.
या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर अमनची १८ ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान भुवनेश्वर (ओडिशा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे.
अमनच्या या यशाबद्दल जैन इरिटेशन जैन प्री युनिव्हर्सिटी महाविद्यालय चे व्यवस्थापन आणि शिक्षकवृंद यांनी त्याचे अभिनंदन केले असून राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.




