Uncategorized
Trending

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सची निवडणूक बिनविरोध

BelgaumPride -July 21, 2026

बेलगाम प्राईड/ बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वर्ष २०२६-२७ साठीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून, सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. प्रवीण रंगोले यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. यामध्ये व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

व्यापारी क्षेत्रातील आजीवन सभासद म्हणून संजय डब्ल्यू. पोतदार, राजेंद्र वाय. मुतगेकर, विक्रमकुमार जैन, वैभव शांताराम वर्णेकर आणि नितीन पारसमल पोरवाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच व्यापारी क्षेत्रातील सर्वसाधारण सभासद म्हणून सुधीर धर्मप्पा चौगुले यांची निवड करण्यात आली आहे.

औद्योगिक क्षेत्रातील आजीवन सभासद म्हणून सतीश जी. कुलकर्णी, आनंद माणिक देसाई आणि अशोक लक्ष्मण कोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय औद्योगिक क्षेत्रातील सर्वसाधारण सभासद म्हणून बसवराज राम्पुरे यांनी स्थान मिळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!