Uncategorized
Trending

रविवार, १२ जुलै रोजी कर्नाटकातील सर्व उपनोंदणी कार्यालये सुरू राहणार

बेलगाम प्राईड/ बंगळूर, दि. १० जुलै: कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व उपनोंदणी कार्यालये रविवार, १२ जुलै २०२६ रोजी नियमितपणे कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महसूल विभागाने (नोंदणी व मुद्रांक) अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

कर्नाटक नोंदणी नियम, १९६५ मधील नियम ५६ तसेच १३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेत करण्यात आलेल्या सुधारणांनुसार, रविवार, १२ जुलै २०२६ हा दिवस ‘कर्तव्य बजावण्याचा दिवस’ (Working Day) म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व उपनोंदणी कार्यालये या दिवशी नेहमीप्रमाणे नागरिकांना सेवा देतील.

महसूल विभागाच्या अवर सचिव सुनिथा एस. यांनी कर्नाटकच्या राज्यपालांच्या आदेशानुसार ही अधिसूचना जारी केली आहे. या आदेशाची प्रत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक आयुक्त, सर्व जिल्हा निबंधक तसेच राज्यातील सर्व उपनोंदणी कार्यालयांना आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!