Uncategorized
Trending

बेळगावच्या ‘लावणी प्रसिद्ध’ स्नेहा नागनगौडा यांना  ‘‘इंडियन स्टार आयकॉन २०२६ अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित

बेलगाम प्राईड/ बेळगाव येथील प्रसिद्ध लावणी नृत्यांगना, अभिनेत्री व मॉडेल स्नेहा अनंत नागनगौडा (पाटील) यांना कलेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय आणि प्रेरणादायी योगदानाबद्दल ‘इंडियन स्टार आयकॉन २०२६ चा अवॉर्ड  देऊन सन्मानित करण्यात आले आहे. बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल जवळील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित ‘कलाशिखर परिषद व गौरव सोहळा २०२६’ मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आर.पी.फाउंडेशन, जीएसके फिल्म प्रॉडक्शन आणि स्वामी समर्थ क्रिएशन, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कला, साहित्य आणि मनोरंजन क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेऊन निवड समितीने स्नेहा नागनगौडा यांची या सन्मानासाठी निवड केली.

‘लावणी क्वीन ऑफ बेळगाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्नेहा नागनगौडा यांना लावणी क्षेत्रात तब्बल १४ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या १२-१३ व्या वर्षापासून कलाप्रवासाला सुरुवात करणाऱ्या स्नेहा यांनी एका शेतकरी कुटुंबातून येत आपल्या जिद्दीच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी त्यांना नॅशनल कला रत्न, कलेचे शिलेदार आणि सावित्रीबाई फुले कला रत्न यांसारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

नृत्यासोबतच अभिनय क्षेत्रातही त्यांनी मराठी, हिंदी व कन्नड माध्यमांत ठसा उमटवला आहे. मराठीतील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेसह हिंदीतील ‘जागृती’ व ‘ बिंदनी’ या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. सध्या त्या एका आगामी मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!