बेळगावच्या हिंडाल्को ब्रिजजवळ वाहनचालकाला मारहाण करून लूट; दोघांना अटक
माळमारुती पोलिसांची कारवाई; १५ ऑक्टोबर रोजी पहाटेची घटना

बेलगाम प्राईड/ शहरातील हिंडाल्को ब्रिजजवळील महामार्गावर बोलेरो वाहन अडवून चालकाला मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेल्याच्या प्रकरणात दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
१५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास हिंडाल्को ब्रिजजवळील महामार्गावर ही घटना घडली होती. संशयितांनी बोलेरो वाहन अडवून थांबवले. त्यानंतर वाहनचालकाला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०९(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लुटलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्यासह आरोपींचा तपास सुरू केला. या तपासादरम्यान दोन संशयितांची नावे समोर आली होती प्रकाश मनेश्वर कटांबळे (वय १८), रा. संताजी गल्ली, कंग्राळी बी. के., बेळगाव. अमित चंद्रगौड पाटील (वय २०), रा. इंदूनगर, पाटील गल्ली, यमनापूर, बेळगाव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त, प्रकाश निकम बेळगाव शहर, पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था), पोलीस उपायुक्त (गुन्हे व वाहतूक) तसेच मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणाचा पुढील तपास माळमारुती पोलीस करत आहेत.




