Uncategorized

बेळगावात महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ

बेलगाम प्राईड/ महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त बेळगाव येथील सर्किट हाऊसजवळ आयोजित कार्यक्रमात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या हस्ते महर्षी वाल्मीकी जयंतीच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन, विधानसभेतील सत्ताधारी पक्षाचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार एन. एच. कोनरेड्डी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सैत, आमदार सी. एस. नाडगौडा, आमदार महांतेश कौजलगी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टिहोळी आणि मृणाल हेब्बाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!