Uncategorized
Trending

दसरा महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी ‘मध्यवर्ती दसरा महामंडळा’चे महानगरपालिकेला निवेदन 

बेलगाम प्राईड/ बेळगावचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला दसरा उत्सव यंदाही अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी ‘मध्यवर्ती दसरा महोत्सव महामंडळ, बेळगाव’च्या वतीने आज महानगरपालिका आयुक्तांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. आयुक्तांच्या अनुपस्थितीत महानगरपालिकेच्या उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर यांनी हे निवेदन स्वीकारले आणि प्रशासनाच्या वतीने सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिले.

गेल्या कित्येक वर्षांपासून मध्यवर्ती दसरा महामंडळाचे मानद अध्यक्ष श्री. रमाकांतदादा कोंडुसकर यांच्या खंबीर आणि कुशल नेतृत्वाखाली बेळगावकरांना अत्यंत शिस्तबद्ध, देखणा आणि नियोजनबद्ध दसरा अनुभवण्यास मिळाला आहे. हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत, यावर्षीही त्याच व्यापक तयारीने आणि वेळेत सर्व कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने महामंडळ आणि पालिका प्रशासनाचे संयुक्त कामकाज तातडीने सुरू व्हावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मध्यवर्ती दसरा महामंडळाचे पदाधिकारी आणि बेळगावातील विविध नामांकित देवस्थानचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:

* महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर.            * उपाध्यक्ष संदीप कामुले.                                          * जनसंपर्क प्रमुख विकास कलघटग.                          * श्री देव दादा सासणकठीचे लक्ष्मण किल्लेकर ,श्रीनाथ पवार ,पंकज किल्लेकर,गिरीश पाटील आणि सौरभ पवार.                                                                     * मारुती गल्ली मारुती देवस्थानचे प्रमोद बिर्जे              * मातंगी देवस्थान (कसाई गल्ली) चे बुद्रुद्दीन.                * वीरभद्र देवस्थान (अशोक नगर) चे मुर्गेंद्र अंगडी.

महामंडळाचे पदाधिकारी किरण खुद्दार, हर्षल नाईक, जोतिबा धामणेकर, प्रसाद मरगाळे. यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

बेळगाव येथे मध्यवर्ती दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना दसरा उत्सवाच्या पूर्वतयारीबाबत निवेदन सादर करण्यात आले. महानगरपालिकेच्या उपायुक्त श्रीमती लक्ष्मी निपाणीकर यांनी हे निवेदन स्वीकारले.

या निवेदनाचा मुख्य उद्देश बेळगावातील ऐतिहासिक दसरा महोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडणे, तसेच महामंडळ व प्रशासन यांच्यातील संयुक्त कामकाज वेळेत पूर्ण करणे हा आहे.

दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते दुरुस्ती, विद्युत रोषणाई, स्वच्छता आणि मुख्य सीमाल्लंघन कार्यक्रमाच्या जागेची पूर्वतयारी प्रशासनाने वेळेत पूर्ण करावी, अशी विनंती यावेळी महामंडळाच्या वतीने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!