Uncategorized
Trending

जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्केटर देवेन बामणेचे बेळगांव मध्ये स्वागत

 

बेलगाम प्राईड/ बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर देवेन बामणे केएलएस जीआईटी इंजिनियर कॉलेज चा विद्यार्थी यांची साऊथ अमेरिका मधील पॅराग्वे सिटी मध्ये जागतिक स्पर्धेसाठी भारतीय स्केटिंग संघात निवड झाली ही निवड चाचणी भुवनेश्वर ओडिशा येथे झाली देवेन आणि साईराज गेली 12 वर्षे स्केटिंग प्रशिक्षन घेत असून या निवड चाचणी साठी त्याने रात्र दिवस खूप मेहनत घेतली होती.

त्याची ही निवड चाचणी स्पीड सलालोम प्रकारात झाली होती या जागतिक स्पर्धेमध्ये 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले स्केटर देवेन याचे आज बेळगांव विमानतळवर आगमन झाले. यावेळी प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी एअरपोर्ट डायरेक्टर त्यागराजन, बीजेपी शहर सेक्रेटरी नागराज पाटील विनोद बामणे, ज्योती बामणे, अर्चना मेंडके, लीना कोरीशेट्टी, दयाआनंद अंकले संगीता अंकले, आणि बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे पालक व स्केटर्स उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!